Low CIBIL Score Personal Loan | कमी सिबिल स्कोर वर मिळवा 50,000 रुपयांचे Personal Loan… पहा संपूर्ण माहिती!

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

आज-काल लोक त्यांच्या महत्त्वाच्या गरजा किंवा योजना पूर्ण करण्यासाठी कर्ज घेत असतात. पण कर्ज देण्यापूर्वी बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोर तपासत असतात कारण सिबिल स्कोर च्या आधारावरच तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे बँका किंवा वित्तीय संस्थांकडून ठरवले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर, सिबिल स्कोर हा बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जदाराच्या संभाव्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी प्राथमिक मापदंड म्हणून वापरला जातो.

सिबिल स्कोर हा 300 ते 900 पर्यंत मोजला जातो. साधारणपणे सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असेल तर चांगला मानला जातो. पण एखाद्या वेळेस सिबिल स्कोर कमी किंवा खराब असेल तर कर्ज मिळणे खूप अवघड होऊन बसते, आणि जरी ते मिळाले तरी तुम्हाला ते खूप व्याजदराने घ्यावे लागते. जर तुमचा सिबिल स्कोर देखील खराब असेल किंवा कमी असेल आणि तुम्हाला पैशाची गरज असेल पण, सिबिल स्कोर मुळे कर्ज मंजूर होत नसेल तर इतर असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या महत्वाच्या गरजा किंवा योजना पूर्ण करण्यासाठी पैशाची व्यवस्था करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण low CIBIL Score 50,000 Personal Loan कसे घ्यायचे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामध्ये आपण Low CIBIL Score Personal Loan मिळवण्याचे कोणकोणते पर्याय आहेत? त्याचबरोबर पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणकोणती लागतात? आणि अर्ज कसा करायचा? या विषयाची माहिती सविस्तरपणे पाहूया.

हे वाचा-  INDmoney app : जर SBI कर्ज देत नसेल तर या ॲपवरून मिळेल 75000 रुपयांचे कर्ज, CIBIL स्कोअर शून्य असताना सुद्धा -Zero Cibil Score Loan

Low CIBIL Score 50,000 Personal Loan घेण्याचे पर्याय खालीलप्रमाणे:

Low CIBIL score personal loan घेण्यासाठी तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. ते पर्याय कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:

सह-अर्जदार मिळवणे/संयुक्त कर्ज

कमी सिबिल स्कोर असलेला व्यक्ती जास्त क्रेडिट स्कोर असलेला सह अर्जदार निवडून कमी सीबिल स्कोर वर कर्ज मिळू शकतो. असे केल्याने बँका किंवा वित्तीय संस्थांना असा विश्वास होतो की कर्जाची परतफेड होण्याची शक्यता आहे. सह अर्जदार किंवा संयुक्त कर्जाचा एक फायदा असा आहे की तुमची सह अर्जदार महिला असेल तर तुम्हाला व्याजदरातही सूट मिळू शकते.

पगारावर कर्ज

तुमच्या सिबिल स्कोर व्यतिरिक्त बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना तुमचा मासिक पगार किती आहे हे पाहत असतात. तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्ही पगार वार्षिक बोनस आणि इतर अतिरिक्त उत्पन्नाचा पुरावा देऊन बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकता. कारण वरील उत्पन्नाच्या पुराव्यावरून तुम्ही हे सिद्ध करू शकता की तुम्ही या कर्जाची परतफेड करण्यास पूर्णपणे सक्षम आहात.

बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) एक चांगला पर्याय

तुम्हाला कर्जाची अत्यंत गरज असेल तर तुम्ही बिगर बँकिंग वित्तीय संस्थाकडून देखील कर्ज करून कर्ज मिळवू शकता. तुमचा सिबिल स्कोर कमी असला तरी येथून तुम्हाला कर्ज मिळू शकते. परंतु बिगर बँकिंग वित्तीय संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा बँकांपेक्षा जास्त असू शकतो.

सोने तारण कर्ज (Gold Loan)

तुमच्याकडे जर सोने असेल तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. गोल्ड लोन हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले जाते. सध्याच्या सोन्याच्या किमतीच्या 75 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला कमी कागदपत्राबरोबरच तुमचा सिबिल स्कोर पाहिला जात नाही. तुम्हाला कर्ज हे सोने तारण ठेवून दिले जाते.

हे वाचा-  सरकारकडून 70 हजार रुपये बिनव्याजी मिळवा. नवीन योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Low CIBIL Score 50,000 Personal Loan पात्रता

Low CIBIL score personal loan घेण्यासाठी काही अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक असते. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे:

  • कमी सिबिल स्कोर वरून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे उत्पन्न हे थेट त्याच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे.

Low CIBIL Score 50,000 Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Low CIBIL score personal loan साठी अर्जदाराला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत हे आपण खाली पाहूया:

  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, युटिलिटी बिले (वीज, पाणी, गॅस) मागील 60 दिवसातील
  • उत्पन्नाचा पुरावा
  • मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • मागील 3 महिन्याचे पगार स्लिप्स
  • पासपोर्ट साईज फोटो

Low CIBIL Score 50,000 Personal Loan व्याजदर

Low CIBIL score personal loan चे व्याजदर प्रतिवर्ष 14% पासून सुरु होतात. सदरच्या कर्जाचे प्रक्रिया शुल्क मंजूर कर्जाच्या दोन टक्के पासून सुरु होते. त्याचबरोबर थकीत ईएमआय वर 2% दरमहा व्याजदर द्यावा लागतो. चेक बाउन्स साठी 500 रुपये इतका दंड भरावा लागतो. (प्रत्येक चेक बाउन्स साठी) कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षे आहे.

हे वाचा-  मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator app

Low CIBIL Score 50,000 Personal Loan Online अर्ज प्रक्रिया

लो सिबिल स्कोर पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सदरचा अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहूया:

  • Low CIBIL Score 50,000 Personal Loan साठी तुम्हाला तुम्ही ज्या Personal Loan App किंवा वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करणार आहात ते ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर तुम्ही ज्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करणार आहात त्या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आवश्यक तपशील देऊन 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमची कर्ज पात्रता तपासू शकता.
  • तुम्ही पर्सनल लोन साठी जो प्लॅटफॉर्म निवडलेला आहे त्यामध्ये पात्र असाल तर तुमच्या पसंतीची कर्जाची रक्कम आणि परतफेड ची मुदत निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला संबंधित कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ही स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
  • तुम्ही दिलेली तुमची वैयक्तिक माहिती पुन्हा एकदा तपासून पहा व अर्ज सबमिट करा.
  • तुमच्या अर्जाची व दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर आणि कर्ज करार यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर कर्जाची रक्कम जलद तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही low CIBIL score personal loan घेऊ शकता.

सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या आवश्यक गरजा व योजना पूर्ण करण्यासाठी हे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!

Leave a Comment