नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण मोफत सिबिल स्कोर कसा चेक करायचा (check CIBIL score free online) याविषयीची माहिती पाहणार आहोत. सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी एक खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहोत की नाही हे या सिबिल स्कोर च्या माध्यमातून समजते. पर्सनल लोन होम लोन घेत असताना सर्वप्रथम आपला सिबिल स्कोर बँका किंवा वित्तीय संस्थांकडून चेक केला जात असतो. या आधारावर तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहात की नाही हे बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून तुम्हाला सुचित केले जाते.
जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर आधीपासूनच माहित असेल तर तुम्हाला खात्री असते की आपल्याला कर्ज मिळेल. यासाठी आपण सदर लेखांमध्ये check CIBIL score free online याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. Check CIBIL score free online पद्धतीने घरी बसून मोबाईल वरून कसा चेक करायचा याचीही माहिती आपण पाहूया.
CIBIL score विषयी थोडक्यात…
CIBIL score हा कर्ज घेणाऱ्या व परतफेड करणारे व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा एक आलेख आहे. च्या द्वारे एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे बँका किंवा वित्तीय संस्थांकडून ठरवले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या CIBIL score चा आलेख ढासळला तर त्याचा परिणाम त्याच्या क्रेडिट स्कोर वर होत असतो. CIBIL score हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 व त्यापुढील सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी खूपच चांगला असतो. सिबिल स्कोर हा कोणताही व्यक्ती वर्षातून एकदा विनामूल्य चेक करू शकतो.
CIBIL score हा CIBIL या कंपनीद्वारे काढला जातो. या कंपनीचे नाव Trans Union CIBIL Ltd. आहे. सिबिल स्कोर हा संबंधित कर्जदार कर्जाची परत यात कळेल की नाही त्याचे परिणाम दर्शवत असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कर्ज देण्याआधी त्याचा सिबिल स्कोर चेक केला जातो. त्यावरूनच एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते.
दैनंदिन जीवनामध्ये आपण CIBIL Score हा शब्दच आपणाला माहित आहे. जो की कर्ज घेण्यासाठी एक गुणवत्ता दर्शवणारा स्कोर म्हणून याची ओळख आहे. पण CIBIL score चा फुल फॉर्म बऱ्याच लोकांना माहित नाही. म्हणून आपण इथे सिबिल स्कोर चा फुल फॉर्म काय आहे ते पाहूया. CIBIL Score Full Form Credit Information Bureau India Ltd. Score असा आहे.
Check CIBIL score free online (सिबिल स्कोर मोफत कसा पाहायचा?)
Check CIBIL score free online तुम्ही वर्षातून एकदा करू शकता. याविषयीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे:
- Check CIBIL score free online पाहण्यासाठी सर्वप्रथम CIBIL च्या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://cibil.com/freecibilscore
- त्यानंतर तुम्हाला Get Your CIBIL Score या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर जो फॉर्म येईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे.
- आता तुमचे एक अकाउंट तयार होईल. त्यामध्ये तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल.
- तुम्हाला तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती एक मेल पाठवला जाईल त्यामध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमच्या अकाउंट तुम्हाला सत्यापीत करावी लागेल.
- पुन्हा एकदा परत मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.
- आता तुम्हाला काही सबस्क्रीप्शन ची माहिती देण्यात येईल त्यानुसार तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिबिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर हे सबस्क्रीप्शन तुम्हाला घ्यावे लागेल.
- पण जर का तुम्ही तुमचा सिबिल रिपोर्ट वर्षातून एकदाच पाहणार असाल तर तुम्ही मोफत पण हे काम करू शकतात त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन सारख्या गोष्टी टाळता येतात.
- आता तुम्ही पॅन कार्ड नंबर सह तुमची अतिरिक्त माहिती भरा. पॅन कार्ड ची माहिती अचूक स्वरूपात टाकले आहे का नाही हे सुनिश्चित करा आणि पुढे जा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे लोन व क्रेडिट संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्यांच्या आधारावर तुमच्या सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल हो तुमचा क्रेडिट अहवाल तयार केला जाईल त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरे अचूक पद्धतीने द्या.
- वरील प्रश्न व उत्तराच्या आधारावर तुमचा सिबिल रिपोर्ट तयार होईल. तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता तसेच तुमचा सिव्हिल रिपोर्ट अहवाल डाऊनलोड करूनही घेऊ शकता.
वरील सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा check CIBIL score free online पाहू शकता. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
सदर लेखांमध्ये आपण check CIBIL score free online विषयाची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही check CIBIL score free online पाहू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच तुमचा स्कोर पाहण्यासाठी मदत करेल. धन्यवाद!